Monday, May 16, 2011 | By: Unknown

तू माझीच!!



सायंकाळी ......
आसमंतात  साचला  होता  धूर 
अन  माझा  मनात  माजले  होते  विचारांचे  काहूर . 
  
आकाशात  पक्षी  परतत  होते  घराकडे ,
ते  बघून   वाटले  कधीतरी  तुही  येशील  अशीच  परत  माझाकडे .
  
सूर्य  बुडू  लागलेला ,त्याची  शेवटची  किरणे  डोंगरामागून  डोकावत होती .
म्हणत  होती  की आता जातोय पण उद्या भेट होईलच आपली .

 आजूबाजूला छान धुंद करणारी हवा होती पण त्याचबरोबर  तू  जोडीला नसल्याची खंतही होती ..


आयुष्याची साथ सोडून आपल्याला बराच काळ लोटला नाही ?
तरी आजही आठवतोय मी ते आपण दोघांनी एकत्र  celebrate केलेले  सोनेरी  क्षण.
  
कधी वाटलं होतं का गं कि हे सुखद क्षण एक दिवस आपल्याला  इतके  जाळतील....?

असा म्हणतात की मेलेल्या माणसाला भावना कुठे असतात? ...
पण हा अवेळी पडणारा थोडूसा पाऊस मला स्पर्श देऊन जातोय ....तुझ्या  अश्रूंचा !


किती  प्रेम  करतेस  माझावर ?
तिथे  स्वर्गात  बसून  पण ?
कदाचित  माझाकडून  झाला  नसता  एवढं   .
म्हणूनच  आजही  तेवढंच प्रेम  करतोय मी तुझावर .


मनातला  हे  काहूर  संपते  न  संपते  तोच  radio वर  सूर  वाजू  लागलेत - "ही   वाट  दूर  जाते  स्वप्ना  मधील  गावा  ...,"


होईल  का  गं  आपली  भेट ? त्या  स्वप्नातल्या  गावी ? ? 
तुझा उत्तराची  वाट  बघतोय ... :मरेस्तोवर ....


माझावर  प्रेम  करताना  थोडा  वेळ  मिळाला  तर  सांग .....
खरच  बघतोय मी  तुझी  वाट !-
------------------------------------निनाद  पेठकर

।।श्री स्वामी समर्थ।।