Wednesday, May 1, 2013 | By: Unknown

महाराष्ट्र दीन

.महाराष्ट्र  दिनाच्या पूर्वसंध्येला आपला इतिहास आलं नजरेसमोर .. आणि वर्तमान सुद्धा....  पश्चाताप झाला .. काय आपला इतिहास आणि कसा वर्तमान ?? भविष्याच तर विचारायलाच  नको . कधी कधी वाटतं कि १०५ मराठी शहिदांच रक्त वाया गेलंय आणि जातंय. महाराष्ट्र दिनाच्या छान दिवशी असा विचार करणं वगैरे काहींना  खटकेल पण त्याला नाईलाज आहे . करणं सभोवताली जे चालू आहे ते खरच पाहवत नाहीये..त्याहून जास्त त्रास होतोय तो हतबलतेचा ... सामान्य माणूस एकटा पडलाय आणि पाहतोय सगळं. पण पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेपुढे तो हतबल आहे .. काहीच करू शकत नाही अशी अवस्था आहे .. भले कोणी म्हणेल योग्य मत द्या आणि तुमचा हक्क घ्या .. अहो पण इथे उमेदवारच नाहीत योग्यतेचे.. त्याच काय ??
                    काळानुसार सामाजिक प्रग्लाभता येण्याऐवजी मराठी समाज रसातळाला जातोय ... संपूर्ण महाराष्ट्र दारूत नासतोय. अक्कलशुन्य पैसेवाले चालवत आहेत राज्य आज .. थोडेफार असतील नग चांगले पण गाव आणि शहर पातळीवर तर बोलण्याची पण सोय नाही .. ठाणे जिल्हा पहा जर म्हणजे एक सणसणीत चपराक बसेल .. अहो इतकंच काय , आमच्या बदलापुरातले so called  नेतेलोग बघा ..  २-४ सोडले तर बाकीचा सर्व "लई झ्याक्क" कारभार आहे ... जर असे जनतेच नेतृत्व (?) करत असतील तर मग सगळं राम भरोसे.  संतांच्या देशात पूर्वी अमृतवाणीचा पूर असे .. आता त्याच देशात पाणी नाही पण मुबलक दारू आहे ... वा!! क्या बात!! 
                 












आज आपल्याकडे सरळ सरळ जातीनिहाय वर्ग पडलेत ..  बाबासाहेब हे केवळ त्यांचेच या आविर्भावात दलित आहेत.. त्यांनी सांगितलेला मार्ग सोडून भलत्याच मार्गावर चालताहेत .. वरून आम्ही बाबांच्या मार्गावर चालत आहोत हा अभिमान (?)  अहो जर बघा डोळे उघडून नीट!!! दुसरीकडे obc बांधव लागलेत मागे आरक्षणाच्या !!  आरक्षणामुळे पडलेली दुफळी कमी होती कि काय कि मागच्या काही वर्षात हे संभाजी बिग्रेडी वाले अजून विष पसरवण्याच काम करताहेत ... अरे नाव काय .. तुमचा कार्य (?) काय ? secularism बोलायचं आणि ब्राम्हण - मराठा - बहुजन यांच्यात लावून द्यायची आग ?? आणि तो पुरषोत्तम(?) खेडेकर.. स्वताचा इतिहास लिहितोय . च्या मारी हे बांडगुळ आता फेकून द्यायची वेळ आहे मित्रांनो..
आज जर टिळक , आगरकर , फुले , सावरकर , रानडे , आंबेडकर असते तर हि अवस्था पाहून नकीच ते नाराज झाले असते... प्रकाशाकडून अंधाराकडे असं आपला प्रवास आहे .. होय .!! दुर्दैवाने हे म्हणव लागेल ... 
विकासाबाबत तर काही न बोलेलच बरं... अजून खूप लिहाव लागेल पण ते संपणार नाही .. असो .. लेख संपवावा लागेल थोडक्यात!! 
 आजच्या पिढीच्या हातात आहे ... आपला भविष्यकाळ आणि पर्यायाने महराष्ट्राचा... संघटीत झालो आपण आज तरच आहे आपला टिकाव हे लक्षात नाही आलं आपल्या तर काही खर नाही .
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एवढं वास्तवभान आलं म्हणजे मिळवलं.

जाता जाता हा video बघा !! थोडं बर वाटेल


।।श्री स्वामी समर्थ।।