Saturday, September 29, 2012 | By: Unknown

True Love


 एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले.सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. 
डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. 

""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' 
""नाही! मला ९ वाजता माझ्याबायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' 
""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' 
""हो! गेली पाच वर्षेहॉस्पिटलमध्येच आहे ती.'' 
""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या?काळजी ही करतील...?'' 
""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले. 

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले,""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?'' 

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो.माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.'' 

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हेखरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतंघेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.'' 

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला- 
""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असंनाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.'' 
यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी,आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं... 
खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं 
प्रेम करणं आपल्याला?...




Monday, July 2, 2012 | By: Unknown

शिल्लक केवळ अंधार






Oxygen...प्राणवायू ... जगण्यासाठी अत्यावश्शक...
पण जर ठिणगी उडाली अन आग लागली तर त्या आगीला धगधगत ठेवणारा सुद्धा हाच Oxygen...
भावनाप्रधान माणसांच्या मनाचं देखील काही असंच असतं...
जोपर्यंत त्यांची मन जपली जातात ना तोपर्यंत ते समोरच्याची जीवापाड काळजी घेतात... पण एकदा का त्यांची मन दुखावली गेली की मग आग लागते... ती क्वचितच दुसऱ्यांना जाळते.. बहुतेक वेळेस ती भावनाप्रधान व्यक्ती स्वतःच जळत राहते....समोरच्याला  काय वाटेल याकडे लक्ष देता देता स्वतःच मन मारते 
                    
भावनाप्रधान माणसांच Oxygen म्हणजे  'किंमत' आणि प्रेम.. त्यावरच ते जगतात...
पण जेंव्हा त्यांची किंमत केली जात नाही तेंव्हा हाच Oxygen त्यांच्या मनातल्या आगीला धगधगत ठेवतो...

आणि मग मागे उरतं ते फक्त जळक मन आणि एकाकीपणाचा अथांग समुद्र 
Friday, March 9, 2012 | By: Unknown

Keyboard माझा......:D

आपल्या नेटकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे mouse  आणि keyboard .
चला तर मग बघूया काही ढिंच्याक कीबोर्ड...



1)LC SYSTEMS WRIST PC KEYBOARD :


MISSION POSSIBLE lol
---------------------------------------------------------------
2)IMPECCA BAMBOO HANDCRAFTED KEYBOARD:






















---------------------------------------------------------------
3)EXTREME STEAMPUNK KEYBOARD
























 ---------------------------------------------------------
4)PHILATELIC STAMPS DECORATED KEYBOARD


stamp  वेड्यांसाठी


 --------------------------------------------------------
5)OPTIMUS POLARIS COMPACT KEYBOARD:
 

 ---------------------------------------------------
6) COMBINATION TABLET COVER AND KEYBOARD

 

नेहमी घाईत आणि गडबडीत असणार्या माझ्यासारख्या उद्योगींसाठी


-------------------------------------------------------------------------------------------------------------
7)HEAVY DUTY WATERPROOF DETACHABLE KEYBOARD
 
-------------------------------------------------------------------------------------------------------------
 8) CHOCOLATE KEYBOARD 





 ------------------------------------------------------------------------------------------------------------
9)HUNT AND PECK KEYBOARD 

 
------------------------------------------------------------------------------------------------------------
10)_LOOK@ME EMOTICON KEYBOARD 

नाजूक युवतीसाठी.....pink fantasy 

---------------------------------------------------------------------------------------------------------------
11)TABSTRUMMER GUITAR KEYBOARD 


ROCKSTAR  साठी 

सड्डा हक्क इथे रख.........



------------------------------------------------------------------------------------------------------------------

12)GOLD PLATED KEYBOARD 
---------------------------------------------------------------------------------------------------------------
13)MULTIMEDIA ORGANIZER KEYBOARD 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
14)OMNIO WOWKEYS iPHONE KEYBOARD
--------------------------------------------------------------------
15)DIY EVO GREEN KEYBOARD
आणि हा माझा सर्वात आवडता....आपण नेहमी GO GREEN च्या बात करत असतो.....
पण अशी शक्कल फार थोडेच वापरतात..
lets GO GREEN ..................:D






Friday, March 2, 2012 | By: Unknown

मुशाफर .........





हा चेहरा , हे हास्य !!
दडलंय या मागे एक वादळ
येणार नाही  कल्पना कोणाला
माझाकडे पाहून


प्रत्येकाच्या प्रेमाखातर
रोज थोडा बदलत गेलो
कळलंच नाही मला
कधी स्वत:ला हरवून बसलो


काल जे नावं ठेवत होते
तेच आज वाहवा करतात
उगवत्या सूर्याला नमस्कार
हिच जगाची रीत सांगतात


जो मी काल होतो
तोच आजही आहे
इतरांच्या नजरेत मात्र
आमुलाग्र बदललो आहे


आज सूर्य मेहेरबान
आहे सर्व प्रकाशमान
पण कसं विसरू मी ?
कसं विसरू मी ??
साधा दिवा लावतानाही
हजारदा पोळत होते हात


हसरा चेहरा बघून
सर्व आता आनंदी आहेत
वास्तवभान मात्र कोणालाच नाही
याची मला खंत आहे


आलो एकटा, जाणारही एकटा
भणंग भटका मी मुशाफर आहे
चार प्रेमाच्या क्षणासाठी तर
जगी  वणवण फिरतो आहे


गवसेल आज ना उद्या रस्ता
तोवर ताऱ्यांची सोबत आहे
सकाळ झाली की मात्र
वास्तवाचे चटके आहेत


शोध हा स्वत्वाचा
संपेल बहुदा सरणावर
पूर्णविराम मिळेल माझ्या असंख्य प्रश्नांना
मृत्यूची भेट झाल्यावर....
---निनाद पेठकर

Thursday, March 1, 2012 | By: Unknown

तेच ते !



















तेच  ते  तेच  ते
सकाळ  पासून  रात्री  पर्यंत  तेच   ते !!!!!
रोजच  उठण्याचा  झोल  आणि  आईचा  ओरडा ,
नेहमीप्रमाणे  आजही लेक्चरचा  खाडा !!!!


परत  तेच classrooms तेच  atmosphere
इथे साला  आपलं मन  नाही  लागत !!


तोच  कट्टा  , तीच  GF, तेच  तिचे  बकवास   नखरे ,,
त्याच  त्या  subject ला  kt आणि त्याच  त्या  मुलांशी  मारामारी !!!!


आता  खरच  आलाय  कंटाळा  या सुट्टीचाही ....
result   चा  पण  नाही  पत्ता ...,
घरचे  रोज  ओरडतात  ,,
अरे  आता  तरी  अभ्यासाला  बसा  !!!


त्यांना  काय  माहिती  हाडाचे  engineer  आहोत .आम्ही ..
11th hour ला  स्टडी  नेहमी  करतो .....बघा तुम्ही!


किती  हा  boaringness.??
देवा  काही  तरी   इंटरेस्टिंग  दे !!!
गंज चढलेल्या या बुद्धीला काहीतरी खाद्य दे !!


रोज बाहेर येतोय एक २ जी स्पेक्ट्रम
रोज मरतोय "आम आदमी"
रोज वाढताहेत पेट्रोल चे भाव तरीही कसे सुखी (?) आम्ही??


रोजच्या या धावपळीत गमावलाय माणूसपण...
आणि हातात बाकी आहे ते रितेपण..
तेच घेऊन रोज धावतोय ,
बघतोय कुठे गवसतय का ते शहाणपण !


सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते ,
चांगला विचार करण्याची देवा सर्वांना बुद्धी दे!
-निनाद पेठकर  
Monday, February 27, 2012 | By: Unknown

मराठी भाषा दिन


श्री स्वामी समर्थ ..
नमस्कार दोस्तहो...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी 
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी 




 मराठी भाषा दिन : आजचा दिवस सर्वत्र मराठी दिन साजरा केला जातो.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.
पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली . ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी २७ फेब्रुवारीला या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोन्दण लाभले.
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.
शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.

सोनेरी भूतकाळ पण भविष्यकाळ ??
              अमृतातेही पैजा जिंकेल अशी आपली मराठी भाषा आहे.. परंतु भाषेचा भूतकाळ जेवढा चांगला , तेवढाच भविष्यकाळ चांगला राहील याची खात्री आपण देऊ शकू का ??मराठी भाषेवरील प्रेम वेगळं आणि ती उत्तम बोलणं वेगळं.आज मराठीमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्द घुसत आहेत.. काही इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द नाहीत.मान्य... पण बव्हंशी आपण शब्दांची भेळ करतो.आजच सकाळी एकाने मला "happy marathi bhasha day" अस ऐकवलं... खरच सांगतो तळपायाची आग मस्तकात गेली..दोन मुस्कटात वाजवाव्याश्या वाटल्या..

अरे! काय हे ??हि कुठली पद्धत झाली ?
आज कॉन्व्हेंट मध्ये मुलं जाताहेत.जावं..पण त्यामुळे त्याची आणि मराठीची नाळ तुटता कामा नये याची खबरदारी त्या आई-वडीलांनी घेणे क्रमप्राप्त आहे.जी घेतलेली दिसत नाही.
त्यामुळे होता काय कि पोराला च्रीस्ती प्रार्थना येते पण रामरक्षा,गणपती स्तोत्र येत नाही .वरून चारचौघात पालक कौतुकाने सांगतात .. "आमचा बाब्या किनई कॉन्व्हेंट मध्ये जातो नं..तिथे काय preyer असते .त्याला बाकी श्लोक बिक येत नाहीत...."यावर हसावं का रडावं तेच कळत नाही .
   एकाबाजूला हे चित्र असताना दुसरीकडे अशीही माणस आहेत की जी मराठीचे संस्कार उत्तम पद्धतीने पुढील पिढीकडे संक्रमित करताहेत.


एकूणच आपल्यात उत्साह आहे . मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे .पण भाजी घेताना मराठी भाजीवाला जरी असला तरी, "भैया ,कांदा कैसा दिया?" असं आपण का बोलतो याचा विचार प्रत्येकाने (बोलत असल्यास!! )करायला हवा!! रामराम !


Sunday, February 26, 2012 | By: Unknown

स्वातंत्रवीर सावरकर




महान क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी, बुद्धीवादी समाज सुधारक, तत्वज्ञ, भाषासुधारक, कवी, लेखक,तेजोनिधी, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी
ज्यावर साक्षात सरस्वतीचा कृपाहस्त होता त्या युगपुरुषाला माझा साष्टांग नमस्कार.
देहरुपाने जरी आज तुम्ही नसलात तरी तुमचे शब्द,तुमचे विचार आमच्याकडे आहेत.
त्यातला प्रत्येक शब्द तुमच्या अमरत्वाची साक्ष देतो.
तुमची जाज्वल्ल्य देशभक्ती , त्याग विस्मरणात गेलेले नाहीत आणि आम्ही ते जाऊ देणार नाही.


-----------------------------------------------------------------------------------


अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


।।श्री स्वामी समर्थ।।