येत्या २६ तारखेला मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण होतील.
९२ च्या बॉम्बस्फोटानंतर भारतात झालेला सर्वात भयानक अतिरेकी हल्ला होता ..
क्रूरकर्मा कसाबला जिवंत पकडण्यात आलं. तुकाराम ओम्बळे शहीद झाले.
कसाब ला फाशीची शिक्षा पण फर्मावण्यात आली.पण अजून तो आपला पाहुणचार झोडतोय.राज्यसरकारच्या तिजोरीवर १६ कोटींचा बोजा पडलाय आत्तापर्यंत !
अजून किती दिवस त्याला पोसणार आपण??
तिकडे राजीव गांधीच्या मारेकर्याबाबत दयेचा विचार सुरु आहे.त्या अफझल गुरुची तीच रडकथा.उद्या हे लोक कसबलापण दया दाखवू असं म्हणतील.
इतकी सहिष्णुता घातकच....
९/११ चा हल्ला झाल्यावर अमेरिकेने सरळ युद्ध सुरु केलं.
२६/११ च्या हल्ल्यात पाकचा सहभाग आहे म्हटल्यावर आपल्याला तेथील अतिरेकी तळ उध्वस्त करणे सहज शक्य होतं.पण तसं झालं नाही.
त्यावेळी जर हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्त केले असते तर त्याचा फायदा झाला असता.खुद्द कॉंग्रेस ला राजकारणात मोठा फायदा झाला असता.पण आपण ती संधी दडवली.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने धडा घेऊन परत असा हल्ला होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.परंतु आपण २६/११ च्या हल्ल्यातून काहीच शिकलो नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागेल.
मागे वळून पाहिलं तर मागच्या ३ वर्षात आपण किती सुधारलो?
केवळ सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या गप्पा झाल्या.नेते मंडळींची कॅमेर्यासमोर बोलण्याची हौस पूर्ण झाली बास.....
सुरक्षा प्रत्यक्षात किती मजबूत झाली?
सरकारला इछाच नाहीये..ना राज्य ना केंद्र.
दरम्यान जे अनेक घोटाळे झाले त्याबद्दल न बोलणे बरे.त्यासाठी एक वेगळा लेख पुढे लिहीन .
राज्यात तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्येच चढाओढ असते.कसं दुसर्याला अडचणीत आणता येईल याची .उरलेला वेळ ठाकरे बंधूंबरोबर वाद घालण्यात जातो.त्यातून वेळ जर उरलाच तर कुठे तरी रस्ता रोको असतो नाहीतर कुठलातरी आंदोलन सुरु असतं.सुरक्षेकडे पाहतो कोण?
आपण सुखी तर जग सुखी अस म्हणण्याची रीत आहेत.
पण त्यानुसार आपण सुरक्षित तर सर्व सुरक्षित असा होत नाही ना!...
नेत्यांना सुरक्षा असते पण सामान्य माणूस रोज जीव मुठीत घेऊन बाहेर पडतो त्याचा काय?
राज्यसरकार मध्ये असा गोंधळ असताना विरोधी पक्ष काय करतोय असा सवाल कुणालाही पडेल..मुळात आज विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाहीये..जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून त्यावर चर्चा करून कल्याणकारी राज्य चालवायचे दिवस गेले आता...
दुर्दैवाने याचं गांभीर्य आपल्या कोणालाच नाही.
आज दिवसागणिक पेट्रोल वाढतंय,अन्नधान्यांचे भाव तर गगनाला टेकले.तिकडे उस आणि आता कापूस शेतकरी आंदोलन करतोय....
नगरपालिका,महानगरपालिका यांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठलाय.
या परिस्थितीत जर बदल घडवायचा असेल तर आज आपल्या तरुण पिढीलाच पुढे यावं लागेल.
राजकारणात जोपर्यंत सामान्य तरुणाचा शिरकाव होत नाही तोपर्यंत विकास एकंदरीत कठीण .अर्थात तिथे जाऊन योग्य काम केलं तरच...नाहीतर परत येरे माझ्या मागल्या....
माझा मत असं आहे कि उत्तम नेत्यापेक्षा आपल्याला उत्तम प्रशासकाची गरज आहे .चांगल्या नेत्याचं महत्व आहेच परतू आज आपल्याकडून जास्तीत जास्त I.A.S , I.P.S ऑफिसर तयार होतील तितक चांगलं....
देशाच्या समाजकारणाची आणि राजकारणाची धुरा जेव्हा आजचा तरुण हाती घेईल तेव्हा सुरुवात होईल एका नव्या युगाची..अर्थात यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्ठेला सद्विचारांची आणि दूरदृष्टीची जोड द्यावी लागेल....
मनात काहीतरी , साठवलेलं
वाचकभेट
Popular Posts
-
आपले आई-वडील कोण असावेत हे आपण ठरवू शकत नाही.पण आपले मित्र कोण असावेत हे मात्र आपल्या हातात असते. मैत्री हि अशा गोष्टींपैकी आ...
-
श्री स्वामी समर्थ .. नमस्कार दोस्तहो... लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मरा...
-
आयुष्य,चहा आणि चहाचा कप यात एक वेगळंच नातं आहे . आयुष्य हे चहा सारखे असतं ...गरम पिण्यातच मजा! एकदा थंड झालेला चहा परत ...
-
एका डॉक्टरांकडे एक ८०-८५वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले.सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले, थो...
-
तेच ते तेच ते सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते !!!!! रोजच उठण्याचा झोल आणि आईचा ओरडा , नेहमीप्रमाणे आजही...
-
महान क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी, बुद्धीवादी समाज सुधारक, तत्वज्ञ, भाषासुधारक, कवी, लेखक,तेजोनिधी, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवी...
-
कधी कधी आपण आयुष्यात इतके गर्क होऊन जातो कि आपल्याला आजूबाजूचं भान राहत नाही. आपण आपल्याच जगात असतो...आपल्याच धुंदीत म्हणा हवं तर ... जगत...
-
. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपला इतिहास आलं नजरेसमोर .. आणि वर्तमान सुद्धा.... पश्चाताप झाला .. काय आपला इतिहास आणि कसा वर्तमान ...
-
आपल्या नेटकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे mouse आणि keyboard . चला तर मग बघूया काही ढिंच्याक कीबोर्ड... 1) LC...
-
हा चेहरा , हे हास्य !! दडलंय या मागे एक वादळ येणार नाही कल्पना कोणाला माझाकडे पाहून प्रत्येकाच्या प्रेमाखातर रोज थोडा बदलत गे...
Followers
Blogroll
ShareThis
Powered by Blogger.
Blog Archive
इस्रो : चार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
अवकाश संशोधन क्षेत्रात इस्त्रोच्या शिरपेचात आज मानाचा तुरा खोवला गेला. आज इस्रोनं चार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. इस्रोच्या श्रीहरिकोटाच्या केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यापैकी दोन उपग्रह आयआयटी (IIT) कानपूर आणि एसआरएम(SRM) युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत.ग्रीनहाऊस गॅसेसेचा अभ्यास करण्यासाठी एक छोटा उपग्रहसुद्धा यात आहे तसेच हवामानाचा अंदाज घेणारा मेघा ट्रॉपीक्स हा भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आलेला मुख्य उपग्रह यात समावेश आहे.अभिमानाची बाब म्हणजे यातील दोन उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत...
अवलिया हरपला.
STEVE JOBS...
तो आला ,त्याने पाहिलं,तो जिंकला........
आज हा अवलिया हे जग सोडून गेला....
असा दुसरा कोणी होणे नाही.....
या टेक्नोलॉजीच्या बादशाहाला माझा सलाम ...
http://www.ynetnews.com/articles/0,7340,L-4131995,00.htmlमुक्तांगण meet:एक सुंदर अनुभव
कधी कधी आपण आयुष्यात इतके गर्क होऊन जातो कि आपल्याला आजूबाजूचं भान राहत नाही. आपण आपल्याच जगात असतो...आपल्याच धुंदीत म्हणा हवं तर ...
जगताना तोच एकसुरी चष्मा चढवतो आणि त्यातून जे दिसेल तेच बरोबर बाकी सब झूट अशी आपली मानसिकता बनते.प्रत्येक गोष्टीला आपण हेच मापदंड लावतो आणि ती चांगली कि वाईट ते ठरवतो.
कधीतरी अशा गोष्टी घडतात कि तो चष्मा आपल्या डोळ्यावरून निघतो आणि जगाचा एक नवा चेहरा ,एक नवा पैलू समोर येतो.नाण्याला हि बाजूसुद्धा आहे तर हे पटतं..असंच काहीसं माझासोबत झालं
गेल्या रविवारी म्हणजे १० जुलैला मी आणि माझा मित्र समीर , आम्ही दोघांनी मुक्तांगणची monthly followup meet attend केली.. तिथे जे विचारधन आणि अनुभव ऐकाला मिळाले ते खूपच परिणामकारक होतं .
Meet होती ठाण्याला I .P .H मध्ये.
Meet बद्दल सांगण्याआधी इथे जायचा योग कसा जुळला ते सांगतो .
व्यसन आणि माझा तसा संबंध नाही.Facebook वर माझी आणि श्री.माधव कोल्हटकर यांची भेट झाली.
ते सध्या मुक्तांगण मध्ये counselor म्हणून काम करतात..
त्यांनी मला विचारलं कि जमेल का यायला monthly meet ला?
रविवार असल्याने वेळेचा काही प्रोब्लेम नव्हता पण एकूण अशा मिटींग्सना मी कधी गेलो नव्हतो.त्यामुळे तिथे काय होईल हे माहित नव्हतं.
पण अनुभवात वाढ होईल या एकमेव हेतूने मी जायचा निर्णय घेतला..
सकाळी उठल्या उठल्या समीरला फोन लावला ,म्हटलं येणार का ? मुक्तांगणची meet आहे I.P.H मध्ये.
त्यालाही आवड असल्यामुळे तोही तयार झाला .
मी निघालो बदलापूरवरून.मनात अनेक विचार होते...जाऊ की नको जाऊ...पावसामुळे गाड्यांचे प्रोब्लेम होते..एक ना अनेक कटकटी ..पण म्हणलं जायचंच...झालं.पोचलो तिथे.conference hall मध्ये बसलो..एक पंधरा -वीस मिनिटात मिटिंग सुरु झाली...मिटिंग चालू करण्या आधी प्रार्थना झाली ... अत्यंत positive आणि हृदयाला भिडणारी!तिथून meet ला सुरवात झाली. माधव बोलत होते.
व्यसन म्हणजे काय ,माणूस व्यसनाधीन कसा होत जातो,तो कसा त्यात गुरफटतो तसेच व्यसनातून बाहेर पडलेल्या पीडितांना घरच्यांच्या मदतीची कशी गरज असते,मुक्तांगणमध्ये नक्की काय केलं जातं या सर्व गोष्टी ते शेअर करत होते.
मुक्तांगण मध्ये admit करताना "हि ब्याद घरात नको"
अशी भावना ठेऊन admit करू नका , हे ते सतत सांगत होते...जे सांगत होते ,शेअर करत होते ते अत्यंत पोटतिडकीने करत आहेत हे दिसत होतं...
हळूहळू वातावरणात एक मोकळेपणा आला आणि मग खऱ्या अर्थाने संवादाला सुरवात झाली.सुरवातीला आम्ही फक्त ऐकत होतो...नंतर बरेच जणं आपली मतं.अनुभव शेअर करू लागले..
तिथे प्रत्येकाचा अनुभव ऐकताना एक वेगळं feeling येत होतं.जे "सोबर" होते त्यांनी 'पिडीत असताना व्यसनामुळे त्यांच्या आयुष्यात कसं नुकसान झालं इथपासून ते आज व्यसनमुक्त कसे आहेत' इथपर्यंत अत्यंत मोकळेपणाने कथन केलं..मी आणि समीर आम्ही सुद्धा काही मुद्द्यांवर बोललो..तिथे सर्वात लहान आम्हीच होतो तरी आमचं बोलणं,आमची मतं तितक्याच मोकळेपणाने ऐकली गेली. कुठेही "तुम्हाला काय माहिती ,तुम्हाला काय अनुभव" असे "typical" प्रश्न कुठेही कोणीही विचारले नाही..हि वैचारिक देवाणघेवाण उत्तरोत्तर रंगत गेली.
या Meet मध्ये प्रवेश करताना मी negativity घेऊन आलेलो..आलो तेव्हा व्यसन आणि व्यसनाधीन पिडीत यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रहदुषित मतं होती ..
मिटिंग संपून बाहेर आलो तेव्हा हि धूळ आतच झटकून दिली.
बाहेर आल्यावर बुद्धीला ,विचारांना एक नवा आयाम मिळाला.
चर्चा करताना जी तत्व मांडण्यात आली ती सर्वसमावेषक होती.
मिटिंग संपायची वेळ आली.माधव यांनी स्वताचा अनुभव कथन केला.त्यांचा स्वानुभव ऐकला आणि हा माणूस पहिल्या वाक्यापासून इतका पोटतिडकीने कसं बोलतोय याचा उलगडा झाला.श्री माधव हे स्वतः एकेकाळी ADDICT होते हे ऐकल्यावर विश्वास बसला नाही.खरच HATS OFF ..
शेवटी मिटिंग संपली आणि मी व समीर भरल्या मनाने बाहेर पडलो.
बाहेर पडताना एक वेगळं समाधान होतं..मनातले गैरसमज दूर झाल्याचं आणि हा चांगला योग जुळल्याचं.!
----निनाद रमेश पेठकर
मुक्तांगण website
मुक्तांगण:Facebook Page
जगताना तोच एकसुरी चष्मा चढवतो आणि त्यातून जे दिसेल तेच बरोबर बाकी सब झूट अशी आपली मानसिकता बनते.प्रत्येक गोष्टीला आपण हेच मापदंड लावतो आणि ती चांगली कि वाईट ते ठरवतो.
कधीतरी अशा गोष्टी घडतात कि तो चष्मा आपल्या डोळ्यावरून निघतो आणि जगाचा एक नवा चेहरा ,एक नवा पैलू समोर येतो.नाण्याला हि बाजूसुद्धा आहे तर हे पटतं..असंच काहीसं माझासोबत झालं
गेल्या रविवारी म्हणजे १० जुलैला मी आणि माझा मित्र समीर , आम्ही दोघांनी मुक्तांगणची monthly followup meet attend केली.. तिथे जे विचारधन आणि अनुभव ऐकाला मिळाले ते खूपच परिणामकारक होतं .
Meet होती ठाण्याला I .P .H मध्ये.
Meet बद्दल सांगण्याआधी इथे जायचा योग कसा जुळला ते सांगतो .
व्यसन आणि माझा तसा संबंध नाही.Facebook वर माझी आणि श्री.माधव कोल्हटकर यांची भेट झाली.
ते सध्या मुक्तांगण मध्ये counselor म्हणून काम करतात..
त्यांनी मला विचारलं कि जमेल का यायला monthly meet ला?
रविवार असल्याने वेळेचा काही प्रोब्लेम नव्हता पण एकूण अशा मिटींग्सना मी कधी गेलो नव्हतो.त्यामुळे तिथे काय होईल हे माहित नव्हतं.
पण अनुभवात वाढ होईल या एकमेव हेतूने मी जायचा निर्णय घेतला..
सकाळी उठल्या उठल्या समीरला फोन लावला ,म्हटलं येणार का ? मुक्तांगणची meet आहे I.P.H मध्ये.
त्यालाही आवड असल्यामुळे तोही तयार झाला .
मी निघालो बदलापूरवरून.मनात अनेक विचार होते...जाऊ की नको जाऊ...पावसामुळे गाड्यांचे प्रोब्लेम होते..एक ना अनेक कटकटी ..पण म्हणलं जायचंच...झालं.पोचलो तिथे.conference hall मध्ये बसलो..एक पंधरा -वीस मिनिटात मिटिंग सुरु झाली...मिटिंग चालू करण्या आधी प्रार्थना झाली ... अत्यंत positive आणि हृदयाला भिडणारी!तिथून meet ला सुरवात झाली. माधव बोलत होते.
व्यसन म्हणजे काय ,माणूस व्यसनाधीन कसा होत जातो,तो कसा त्यात गुरफटतो तसेच व्यसनातून बाहेर पडलेल्या पीडितांना घरच्यांच्या मदतीची कशी गरज असते,मुक्तांगणमध्ये नक्की काय केलं जातं या सर्व गोष्टी ते शेअर करत होते.
मुक्तांगण मध्ये admit करताना "हि ब्याद घरात नको"
अशी भावना ठेऊन admit करू नका , हे ते सतत सांगत होते...जे सांगत होते ,शेअर करत होते ते अत्यंत पोटतिडकीने करत आहेत हे दिसत होतं...
![]() | ||

या Meet मध्ये प्रवेश करताना मी negativity घेऊन आलेलो..आलो तेव्हा व्यसन आणि व्यसनाधीन पिडीत यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रहदुषित मतं होती ..
मिटिंग संपून बाहेर आलो तेव्हा हि धूळ आतच झटकून दिली.
बाहेर आल्यावर बुद्धीला ,विचारांना एक नवा आयाम मिळाला.
चर्चा करताना जी तत्व मांडण्यात आली ती सर्वसमावेषक होती.
मिटिंग संपायची वेळ आली.माधव यांनी स्वताचा अनुभव कथन केला.त्यांचा स्वानुभव ऐकला आणि हा माणूस पहिल्या वाक्यापासून इतका पोटतिडकीने कसं बोलतोय याचा उलगडा झाला.श्री माधव हे स्वतः एकेकाळी ADDICT होते हे ऐकल्यावर विश्वास बसला नाही.खरच HATS OFF ..
शेवटी मिटिंग संपली आणि मी व समीर भरल्या मनाने बाहेर पडलो.
बाहेर पडताना एक वेगळं समाधान होतं..मनातले गैरसमज दूर झाल्याचं आणि हा चांगला योग जुळल्याचं.!
----निनाद रमेश पेठकर
मुक्तांगण website
मुक्तांगण:Facebook Page
आयुष्य,चहा आणि चहाचा कप
आयुष्य,चहा आणि चहाचा कप यात एक वेगळंच नातं आहे .
आयुष्य हे चहा सारखे असतं ...गरम पिण्यातच मजा!
एकदा थंड झालेला चहा परत गरम करून पिण्यात काही मजा नाही. चहा थंड प्या ,गरम प्या किंवा फेकून द्या .....शेवटी उरतं तो फक्त रिकामा ग्लास ......
पण त्या रिकाम्या ग्लासला पण आशा असते ......
नवीन ताजा चहा पडण्याची ...
"तुका म्हणे उगी राहावे . ..जेजे होईल ते ते पाहावे "
या उक्तीला स्मरून तो बिचारा ग्लास निर्विकारपणे येणाऱ्या प्रत्येक चहा कडे बघतो ....
फक्कड चहा पडला म्हणून आनंदून जात नाही ...कि रटरट उकळलेला काळा चहा पडला म्हणून तो रडत नाही ....
येणारा प्रत्येक चहा स्वतः चा असा रंग ,चव घेऊन येतो .....
आणि त्या बदल्यात कपाला उब देऊन जातो ....
तो बिचारा तेव्हड्यावरच खुश !!!..
पण त्याचा हा जल्लोष टिकतो तो त्यातला चहा संपेपर्यंत ........
चहा संपला की लगेच त्याला बुचकळून काढलं जातं.
नवीन चहा ला सामोरं जाण्यासाठी ..
स्वतचा सगळं विसरून हा पठ्ठ्या मात्र आपल्याला शिकवतो -----आस्वाद घ्यायला ...
एवडूसा तो चहाचा कप पण मला मात्र खूप काही देऊन जातो ...
हरेक चहा त्यावर स्वतची छाप ,,चिकटपणा ठेऊन जातो .....पण दरवेळी बुचकळून काढल्यानंतर हा मात्र पहिल्यासारखाच स्वच्छ..
कसं जमत याला कुणास ठाऊक?...
कदाचित याचा कडे असावा बुचकळणारयाचा हात .त्याचीच ही किमया असावी.
सुख असो वा दुख: त्याला सहजपणे सामोरं जायला हवं हे तो दर्शवतो.
नकारात्मक विचारांची मालिका,मनावरचा मळभ,.वाईट संगत,न्यूनगंड या गोष्टी सहज फेकून देता येत नाहीत ..त्या फेकायला एक झटकाच लागतो ....
त्या झटक्याचा source आपल्याकडे असण महत्त्वाचं! ...
नकारात्मक विचार तर सतत आपल्या आजूबाजूला असतात ...पण त्यांना धुवून कसं टाकायचा हे माहित पाहिजे .........
शेवटी रितेपण हेच शिल्लक राहणार ...त्याला काही उपाय नाही ....

पण या सर्व अवधीत एकाच प्रश्नाचं महत्व आहे ....
आस्वाद घेतला का ????
तू माझीच!!
सायंकाळी ......
आसमंतात साचला होता धूर
अन माझा मनात माजले होते विचारांचे काहूर .
आकाशात पक्षी परतत होते घराकडे ,
ते बघून वाटले कधीतरी तुही येशील अशीच परत माझाकडे .
सूर्य बुडू लागलेला ,त्याची शेवटची किरणे डोंगरामागून डोकावत होती .
म्हणत होती की आता जातोय पण उद्या भेट होईलच आपली .
आजूबाजूला छान धुंद करणारी हवा होती पण त्याचबरोबर तू जोडीला नसल्याची खंतही होती ..
आयुष्याची साथ सोडून आपल्याला बराच काळ लोटला नाही ?
तरी आजही आठवतोय मी ते आपण दोघांनी एकत्र celebrate केलेले सोनेरी क्षण.
कधी वाटलं होतं का गं कि हे सुखद क्षण एक दिवस आपल्याला इतके जाळतील....?
असा म्हणतात की मेलेल्या माणसाला भावना कुठे असतात? ...
पण हा अवेळी पडणारा थोडूसा पाऊस मला स्पर्श देऊन जातोय ....तुझ्या अश्रूंचा !
किती प्रेम करतेस माझावर ?
तिथे स्वर्गात बसून पण ?
कदाचित माझाकडून झाला नसता एवढं .
म्हणूनच आजही तेवढंच प्रेम करतोय मी तुझावर .
मनातला हे काहूर संपते न संपते तोच radio वर सूर वाजू लागलेत - "ही वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा ...,"
होईल का गं आपली भेट ? त्या स्वप्नातल्या गावी ? ?
तुझा उत्तराची वाट बघतोय ... :मरेस्तोवर ....
माझावर प्रेम करताना थोडा वेळ मिळाला तर सांग .....
खरच बघतोय मी तुझी वाट !-
------------------------------------निनाद पेठकर
Subscribe to:
Posts (Atom)
।।श्री स्वामी समर्थ।।
Blog Archive
About Me
- Unknown