Friday, March 2, 2012 | By: Unknown

मुशाफर .........





हा चेहरा , हे हास्य !!
दडलंय या मागे एक वादळ
येणार नाही  कल्पना कोणाला
माझाकडे पाहून


प्रत्येकाच्या प्रेमाखातर
रोज थोडा बदलत गेलो
कळलंच नाही मला
कधी स्वत:ला हरवून बसलो


काल जे नावं ठेवत होते
तेच आज वाहवा करतात
उगवत्या सूर्याला नमस्कार
हिच जगाची रीत सांगतात


जो मी काल होतो
तोच आजही आहे
इतरांच्या नजरेत मात्र
आमुलाग्र बदललो आहे


आज सूर्य मेहेरबान
आहे सर्व प्रकाशमान
पण कसं विसरू मी ?
कसं विसरू मी ??
साधा दिवा लावतानाही
हजारदा पोळत होते हात


हसरा चेहरा बघून
सर्व आता आनंदी आहेत
वास्तवभान मात्र कोणालाच नाही
याची मला खंत आहे


आलो एकटा, जाणारही एकटा
भणंग भटका मी मुशाफर आहे
चार प्रेमाच्या क्षणासाठी तर
जगी  वणवण फिरतो आहे


गवसेल आज ना उद्या रस्ता
तोवर ताऱ्यांची सोबत आहे
सकाळ झाली की मात्र
वास्तवाचे चटके आहेत


शोध हा स्वत्वाचा
संपेल बहुदा सरणावर
पूर्णविराम मिळेल माझ्या असंख्य प्रश्नांना
मृत्यूची भेट झाल्यावर....
---निनाद पेठकर

2 comments:

Amit Vele said...

IT was awsm...keep it up bro :)

मुक्काम पोष्ट घोडपदेव said...

सुंदर……… अतिसुंदर

Post a Comment

।।श्री स्वामी समर्थ।।