Wednesday, June 15, 2011 | By: Unknown

आयुष्य,चहा आणि चहाचा कप



आयुष्य,चहा आणि चहाचा कप  यात  एक  वेगळंच  नातं  आहे .
आयुष्य  हे  चहा  सारखे  असतं  ...गरम  पिण्यातच  मजा!
 एकदा  थंड  झालेला  चहा  परत  गरम  करून  पिण्यात  काही  मजा  नाही. चहा  थंड  प्या ,गरम  प्या  किंवा  फेकून  द्या .....शेवटी उरतं तो फक्त  रिकामा  ग्लास ......
पण  त्या  रिकाम्या  ग्लासला  पण आशा  असते ......
नवीन  ताजा  चहा  पडण्याची ...


"तुका  म्हणे  उगी  राहावे . ..जेजे  होईल  ते  ते  पाहावे " 
 या  उक्तीला  स्मरून  तो  बिचारा  ग्लास  निर्विकारपणे  येणाऱ्या  प्रत्येक  चहा  कडे  बघतो ....


फक्कड  चहा  पडला  म्हणून  आनंदून  जात  नाही ...कि   रटरट  उकळलेला  काळा चहा  पडला  म्हणून  तो  रडत  नाही ....
येणारा  प्रत्येक  चहा   स्वतः चा  असा  रंग ,चव  घेऊन  येतो .....
आणि  त्या  बदल्यात  कपाला  उब  देऊन  जातो ....
तो  बिचारा  तेव्हड्यावरच खुश !!!..
पण  त्याचा   हा जल्लोष  टिकतो  तो  त्यातला  चहा   संपेपर्यंत ........
चहा  संपला  की लगेच  त्याला  बुचकळून काढलं जातं.
नवीन  चहा  ला  सामोरं जाण्यासाठी ..
स्वतचा  सगळं  विसरून  हा  पठ्ठ्या  मात्र  आपल्याला   शिकवतो -----आस्वाद  घ्यायला   ...
एवडूसा तो  चहाचा  कप  पण  मला  मात्र  खूप  काही  देऊन  जातो ...
हरेक  चहा  त्यावर स्वतची   छाप ,,चिकटपणा  ठेऊन  जातो .....पण  दरवेळी  बुचकळून  काढल्यानंतर  हा    मात्र  पहिल्यासारखाच  स्वच्छ..
कसं  जमत  याला  कुणास  ठाऊक?...
कदाचित याचा कडे असावा बुचकळणारयाचा  हात .त्याचीच ही किमया असावी. 


सुख  असो  वा  दुख: त्याला  सहजपणे  सामोरं  जायला  हवं  हे तो दर्शवतो.    
नकारात्मक  विचारांची  मालिका,मनावरचा  मळभ,.वाईट  संगत,न्यूनगंड  या  गोष्टी  सहज  फेकून  देता  येत  नाहीत ..त्या  फेकायला  एक  झटका लागतो ....
त्या  झटक्याचा  source  आपल्याकडे  असण  महत्त्वाचं! ...
नकारात्मक  विचार  तर  सतत  आपल्या  आजूबाजूला  असतात ...पण  त्यांना  धुवून  कसं  टाकायचा  हे  माहित  पाहिजे .........
शेवटी  रितेपण  हेच  शिल्लक  राहणार ...त्याला  काही  उपाय  नाही ....
ग्लासातल्या  चहा  प्रमाणे  आयुष्याचाही  volume   कमी  कमी  होत  होत मृत्यूची भेट  होणार  आहेच  .....
पण  या  सर्व  अवधीत  एकाच  प्रश्नाचं  महत्व  आहे ....


आस्वाद  घेतला  का ????



।।श्री स्वामी समर्थ।।