जगताना तोच एकसुरी चष्मा चढवतो आणि त्यातून जे दिसेल तेच बरोबर बाकी सब झूट अशी आपली मानसिकता बनते.प्रत्येक गोष्टीला आपण हेच मापदंड लावतो आणि ती चांगली कि वाईट ते ठरवतो.
कधीतरी अशा गोष्टी घडतात कि तो चष्मा आपल्या डोळ्यावरून निघतो आणि जगाचा एक नवा चेहरा ,एक नवा पैलू समोर येतो.नाण्याला हि बाजूसुद्धा आहे तर हे पटतं..असंच काहीसं माझासोबत झालं
गेल्या रविवारी म्हणजे १० जुलैला मी आणि माझा मित्र समीर , आम्ही दोघांनी मुक्तांगणची monthly followup meet attend केली.. तिथे जे विचारधन आणि अनुभव ऐकाला मिळाले ते खूपच परिणामकारक होतं .
Meet होती ठाण्याला I .P .H मध्ये.
Meet बद्दल सांगण्याआधी इथे जायचा योग कसा जुळला ते सांगतो .
व्यसन आणि माझा तसा संबंध नाही.Facebook वर माझी आणि श्री.माधव कोल्हटकर यांची भेट झाली.
ते सध्या मुक्तांगण मध्ये counselor म्हणून काम करतात..
त्यांनी मला विचारलं कि जमेल का यायला monthly meet ला?
रविवार असल्याने वेळेचा काही प्रोब्लेम नव्हता पण एकूण अशा मिटींग्सना मी कधी गेलो नव्हतो.त्यामुळे तिथे काय होईल हे माहित नव्हतं.
पण अनुभवात वाढ होईल या एकमेव हेतूने मी जायचा निर्णय घेतला..
सकाळी उठल्या उठल्या समीरला फोन लावला ,म्हटलं येणार का ? मुक्तांगणची meet आहे I.P.H मध्ये.
त्यालाही आवड असल्यामुळे तोही तयार झाला .
मी निघालो बदलापूरवरून.मनात अनेक विचार होते...जाऊ की नको जाऊ...पावसामुळे गाड्यांचे प्रोब्लेम होते..एक ना अनेक कटकटी ..पण म्हणलं जायचंच...झालं.पोचलो तिथे.conference hall मध्ये बसलो..एक पंधरा -वीस मिनिटात मिटिंग सुरु झाली...मिटिंग चालू करण्या आधी प्रार्थना झाली ... अत्यंत positive आणि हृदयाला भिडणारी!तिथून meet ला सुरवात झाली. माधव बोलत होते.
व्यसन म्हणजे काय ,माणूस व्यसनाधीन कसा होत जातो,तो कसा त्यात गुरफटतो तसेच व्यसनातून बाहेर पडलेल्या पीडितांना घरच्यांच्या मदतीची कशी गरज असते,मुक्तांगणमध्ये नक्की काय केलं जातं या सर्व गोष्टी ते शेअर करत होते.
मुक्तांगण मध्ये admit करताना "हि ब्याद घरात नको"
अशी भावना ठेऊन admit करू नका , हे ते सतत सांगत होते...जे सांगत होते ,शेअर करत होते ते अत्यंत पोटतिडकीने करत आहेत हे दिसत होतं...
![]() | ||

या Meet मध्ये प्रवेश करताना मी negativity घेऊन आलेलो..आलो तेव्हा व्यसन आणि व्यसनाधीन पिडीत यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रहदुषित मतं होती ..
मिटिंग संपून बाहेर आलो तेव्हा हि धूळ आतच झटकून दिली.
बाहेर आल्यावर बुद्धीला ,विचारांना एक नवा आयाम मिळाला.
चर्चा करताना जी तत्व मांडण्यात आली ती सर्वसमावेषक होती.
मिटिंग संपायची वेळ आली.माधव यांनी स्वताचा अनुभव कथन केला.त्यांचा स्वानुभव ऐकला आणि हा माणूस पहिल्या वाक्यापासून इतका पोटतिडकीने कसं बोलतोय याचा उलगडा झाला.श्री माधव हे स्वतः एकेकाळी ADDICT होते हे ऐकल्यावर विश्वास बसला नाही.खरच HATS OFF ..
शेवटी मिटिंग संपली आणि मी व समीर भरल्या मनाने बाहेर पडलो.
बाहेर पडताना एक वेगळं समाधान होतं..मनातले गैरसमज दूर झाल्याचं आणि हा चांगला योग जुळल्याचं.!
----निनाद रमेश पेठकर
मुक्तांगण website
मुक्तांगण:Facebook Page
4 comments:
khoop chan mitra..third person views khoop important astat..unless we listen and see ourself we shouldnt comment..pan tu ani sameer alat ani tyat involve jhalat its admirable..tumhi dogha dar mahinyala yal ashi apeksha karto...
Khoop Chhaan !! Malahi yayla Nakki Avadel !!!
निनाद आणी समीर तुमचा दोघान कडून अपेक्षा वाढली आहेत. आता हा संदेश तुम्ही कमीत कमी प्रत्येकी किमान ५० लोकां पर्यंत पोहोचावा आणी व्यक्तीला जवळ करा,व्यसनाला लांब करा व्यसनी व्यक्तीला नाही.
नक्कीच ..आम्हीदेखील खारीचा वाट नक्की उचलू..
जितक्या व्यक्तींपर्यंत हि महती आणि माहिती पोहचवता येईल तितकी ती पोचवू.
comment करिता धन्यवाद
Post a Comment