Sunday, August 4, 2013 | By: Unknown

मैत्री





आपले आई-वडील कोण असावेत हे आपण ठरवू शकत नाही.पण आपले मित्र कोण असावेत हे मात्र आपल्या हातात असते.
मैत्री हि अशा गोष्टींपैकी  आहे की जिच्याशिवाय हे आयुष्य व्यर्थ भासते .
दोन मुलं ,दोन मुली अथवा १ मुलगा -१ मुलगी मित्र असोत , हे एक असं नातं आहे जे प्रत्येकासाठी आधाराचं काम करतं.टेन्शन तर आज प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . पण ते बिनधास्तपणे शेअर करण्यासाठी मित्र ज्यांच्याकडे आहेत त्याचं निम्मं टेन्शन तिथेच दूर होतं.

माझ्या प्रत्येक मित्रासाठी हा पोस्ट आहे .माझे नालायक मित्र जे मला आवडणाऱ्या मुलीसामोरच माझी भंकस करतात तरीही  नेहमी काहीतरी जुगाड करून आपला काम फिट करतात  त्याच हलकट मित्रांसाठी हा पोस्ट.त्यांच्या या नालायकपणातच दडलंय माझ्याबद्दलच प्रेम.आजारी पडल्यावर शिव्या घालणाऱ्या सर्व काळजीवाहू मित्रांसाठी हा पोस्ट . आजारी पडल्यावर स्वताच्या assignments न लिहिता माझ्या assignments  पूर्ण करणाऱ्या अतरंगी मित्रांसाठी हा पोस्ट.माझ्या मैत्रिणींसाठी हा पोस्ट ज्या सदैव अभ्यास आणि भंकस यांचा तोल ठेवायला बजावत असतात.
माझा खास दोस्त जो सध्या दूर आहे परंतु तेवढाच connected आहे त्याच्यासाठी हा पोस्ट.
माझी खास मैत्रीण जी चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्यासोबत प्रत्यक्ष असते तिच्यासाठीदेखील 
माझ्या सर्व सर्व दोस्तांसाठी.
I thank god that he introduced us in somewhat freakiest style.Life would have been difficult without u guys!!! Thanks for being my friend!




मैत्री

जिथे बोलण्यासाठी शब्दांची " गरज नसते,
आनंद  दाखवायला "हास्याची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवांची  " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ती म्हणजे " मैत्री "

जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री.......... 



0 comments:

Post a Comment

।।श्री स्वामी समर्थ।।