Thursday, November 24, 2011 | By: Unknown

देशकारण:अराजकाची ३ वर्ष

येत्या २६ तारखेला मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण होतील.
९२ च्या बॉम्बस्फोटानंतर भारतात झालेला सर्वात भयानक अतिरेकी हल्ला होता ..
क्रूरकर्मा कसाबला जिवंत पकडण्यात आलं. तुकाराम ओम्बळे शहीद झाले.
कसाब ला फाशीची शिक्षा पण फर्मावण्यात आली.पण अजून तो आपला पाहुणचार झोडतोय.राज्यसरकारच्या तिजोरीवर १६ कोटींचा बोजा पडलाय आत्तापर्यंत !
अजून किती दिवस त्याला पोसणार आपण??
तिकडे राजीव गांधीच्या मारेकर्याबाबत दयेचा विचार सुरु आहे.त्या अफझल गुरुची तीच रडकथा.उद्या हे लोक कसबलापण दया दाखवू असं म्हणतील.
इतकी सहिष्णुता घातकच....
९/११ चा हल्ला झाल्यावर अमेरिकेने सरळ युद्ध सुरु केलं.
२६/११ च्या हल्ल्यात पाकचा सहभाग आहे म्हटल्यावर आपल्याला तेथील अतिरेकी तळ उध्वस्त करणे  सहज शक्य होतं.पण तसं झालं नाही.
त्यावेळी जर हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्त केले असते तर त्याचा फायदा  झाला असता.खुद्द कॉंग्रेस ला राजकारणात मोठा फायदा झाला असता.पण आपण ती संधी दडवली.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने धडा घेऊन परत असा हल्ला होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.परंतु आपण २६/११ च्या हल्ल्यातून काहीच शिकलो नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागेल.





 मागे वळून पाहिलं तर  मागच्या ३ वर्षात आपण किती सुधारलो?
केवळ सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या गप्पा झाल्या.नेते मंडळींची कॅमेर्यासमोर बोलण्याची हौस पूर्ण झाली बास.....
सुरक्षा प्रत्यक्षात किती मजबूत झाली?
सरकारला इछाच नाहीये..ना राज्य ना केंद्र.
दरम्यान जे अनेक घोटाळे झाले त्याबद्दल न बोलणे बरे.त्यासाठी एक वेगळा लेख पुढे लिहीन .


राज्यात तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्येच चढाओढ असते.कसं दुसर्याला अडचणीत आणता येईल याची .उरलेला वेळ ठाकरे बंधूंबरोबर वाद घालण्यात जातो.त्यातून वेळ जर उरलाच तर कुठे तरी रस्ता रोको असतो नाहीतर कुठलातरी आंदोलन सुरु असतं.सुरक्षेकडे पाहतो कोण?

आपण सुखी तर जग सुखी अस म्हणण्याची रीत  आहेत.
पण त्यानुसार आपण सुरक्षित तर सर्व सुरक्षित असा होत नाही ना!...
नेत्यांना सुरक्षा असते पण सामान्य माणूस रोज जीव मुठीत घेऊन बाहेर पडतो त्याचा काय?
राज्यसरकार मध्ये असा गोंधळ असताना विरोधी पक्ष काय करतोय असा सवाल कुणालाही पडेल..मुळात आज विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाहीये..जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून त्यावर चर्चा करून कल्याणकारी राज्य चालवायचे दिवस गेले आता...             
दुर्दैवाने याचं गांभीर्य आपल्या कोणालाच नाही.
आज दिवसागणिक पेट्रोल वाढतंय,अन्नधान्यांचे भाव तर गगनाला टेकले.तिकडे उस आणि आता कापूस शेतकरी आंदोलन करतोय....
नगरपालिका,महानगरपालिका यांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठलाय.

या परिस्थितीत जर बदल घडवायचा असेल तर आज आपल्या तरुण पिढीलाच पुढे यावं लागेल.
 राजकारणात जोपर्यंत सामान्य तरुणाचा शिरकाव होत नाही तोपर्यंत विकास एकंदरीत कठीण .अर्थात तिथे जाऊन योग्य काम केलं तरच...नाहीतर परत येरे माझ्या मागल्या....
माझा मत असं आहे कि उत्तम नेत्यापेक्षा आपल्याला उत्तम प्रशासकाची गरज आहे .चांगल्या नेत्याचं महत्व आहेच परतू आज आपल्याकडून जास्तीत जास्त I.A.S , I.P.S ऑफिसर तयार होतील तितक चांगलं....


देशाच्या समाजकारणाची आणि राजकारणाची धुरा जेव्हा आजचा तरुण हाती घेईल तेव्हा सुरुवात होईल एका नव्या युगाची..अर्थात यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्ठेला सद्विचारांची आणि दूरदृष्टीची जोड द्यावी लागेल.... 

।।श्री स्वामी समर्थ।।