Thursday, March 14, 2013 | By: Unknown

मुक्त छंद



आयुष्य कसं मुक्तछंदाप्रमाणे असावं. कोणताही बंधन नाही , कसली चिंता नाही !
एक छंद असावा वाचनाचा . जोडीला वाफाळत्या चहाचा कप !
नजर फिरवू तिथे निसर्ग आणि मनाला गवसन्णारा आनंद ..
बाह्यजगापासून अलिप्त . स्वतात  विलीन आणि मनात त्या सर्वोच्च शक्तीचा निनाद !

या भौतिक जगापासून दूर कुठेतरी जावसं वाटतं.. जिथे विकृतीचा स्पर्श नसेल . जिथे अव्वल नंबर मिळवण्यासाठी घाणेरडी , जीवघेणी स्पर्धा नसेल. जिथे गुणांना महत्व असेल आणि आकड्यांना नाही !!

जावसं वाटतं गर्द रानात ! डोळे फाटेस्तोवर साठवावी हिरवाई . विविधरंगी फुलांवर चालणारे फुलपाखरांचे लयदार नृत्य पाहावे आणि वेळेचं भान विसरून जावे ..

या स्वार्थी दुनियेतून बाहेर यावं आणि आजच्यासाठी पुरेल इतकं प्रेम निसर्गाकडून घेऊन परतावं.
उद्याची चिंता कशाला ?? तो आहेच न द्यायला?



कशाला उद्याची बात म्हणून फेकून द्या मनावरचं ओझं भविष्याचं आणि हा क्षण गा...... स्वतासाठी !!!




0 comments:

Post a Comment

।।श्री स्वामी समर्थ।।