Tuesday, April 23, 2013 | By: Unknown

मी टिळा का लावतो ??


मी टिळा का लावतो ?? टिळा लावून गेलो कि कॉलेज मध्ये नेहमी मला "राज" सारखा दिसतोस , एकदम वास्तव style बनून आला आहेस असं बोलतात .. पण मी कधी उत्तर देत नाही त्यावर .... हे जरूर वाचा.. पटल तर तुम्ही पण सामील व्हा !


हिंदू टिळा का लावतात...??

उत्तर - हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने
समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा
लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर
साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक
महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो.
हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन
नाड्या

१) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण
म्हणतात.

हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण
आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे.
योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले
बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी
पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर
तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो.

साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त
लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे.

टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे

0 comments:

Post a Comment

।।श्री स्वामी समर्थ।।